आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणी वाढल्या:राहुल गांधींविरोधात पुणे कोर्टात मानहानीचा दावा, स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्याचा सत्यकी सावरकरांचा आरोप

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर पुणे सत्र न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय. सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केलेल्या वक्तव्यावर ही तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले सत्यकी सावरकर?

एएनआयशी बोलताना सत्यकी सावरकर यांनी ही माहिती दिली. त्यात ते म्हणाले, “राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी एका भेटीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना चुकीची माहिती दिली आहे.

परंतु, राहुल गांधी यांनी सांगितलेला हा संदर्भ खोटा असून काल्पनिक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून आम्ही अनेकदा सावरकर यांच्याविरोधातील तथाकथीत माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकले आहे. पण प्रत्यक्षात त्या क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सावरकरांविरोधातील या विधानांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती सत्यकी सावरकर यांनी दिली आहे.

काय म्हणाले हाते राहुल गांधी?

सावरकरांनी आपल्या 5 ते 6 मित्रांच्या मदतीने एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा आनंद लुटला होता”, असे राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये वक्तव्य केले होते.