आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी खडकी रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे-लोणावळा लोकल रोखत केंद्र सरकारचा व ईडीचा निषेध केला.
या आंदोलनात राष्ट्रीय सरचिटणीस मितेंद्र सिंग, प्रतिमा मुदगल, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, प्रथमेश आबनावे, पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाठ, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सचिव उमेश पवार, अनिकेत नवले, अनिकेत अरकडे, सौरभ अमराळे, अक्षय माने, अजित ढोकळे, राकेश मारणे आदी उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार सूड भावनेने वागत आहे. सोनियाजींना केवळ मानसिक त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना मागे लावले जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर आणि जनहिताचे काम करणाऱ्या सोनिया गांधींना ईडीच्या कार्यालयात बोलावल्याचा निषेधार्थ येथे रेल रोको आंदोलन करण्यात आल्याचे मितेंद्र सिंग यांनी सांगितले.
इराणी विरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन
पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या फसवेगिरी विरोधात बुधवारी गुडलक चौक, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा मनिष आनंद यांनी मोदी सरकारच्या चुप्पीवर प्रश्न उपस्थित केला.
त्या म्हणाल्या, ‘जी व्यक्ती 13 महिन्यांपूर्वी वारली, तिच्या नावे लायसेन्स कसे मिळू शकते ? कोणाच्या प्रभावामुळे गोवा येथील इराणी यांचा बार चालू आहे ? कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली का करण्यात आली ? कारण स्पष्ट आहे की स्मृती इराणी यांनी भ्रष्टाचार केला आहे त्या खोट्या बोलत आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेविका सुजाता ताई शेट्टी, वैशाली मराठे, अश्विनी गवारे, प्राची दुधाने, स्वाती शिंदे, वैशाली रेड्डी, राजश्री अडसूळ, श्रद्धा राजेंद्र, सुजाता चिंता, पपीता सोनवणे, माया डुरे, नंदा डावरे, सुनीता नेमुर, संगीता पवार, अनिता गोयर, जरीना खान व इतर महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.