आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचे भाष्य:भाजप-मनसे युतीवर राज ठाकरेंनी केले भाष्य, म्हणाले - 'भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत'

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु - देवेंद्र फडणवीस

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान नाशिक दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. यानंतर या चर्चांना बळकटी मिळाली. आता राज ठाकरेंनी या विषयावर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, या चर्चा फक्त माध्यमांमध्येच आहेत. तसेच माझी भूमिका स्पष्ट काय करायची, माझ्या भूमिका या स्पष्ट आहेत.

या चर्चा फक्त माध्यमांमध्ये
भाजप आणि मनसेच्या युतीविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच होत आहे. चंद्रकांत पाटील यांना मी कोणतीही व्हीडिओ क्लिप पाठवलेली नाही. त्या प्रकारची क्लिप मी पाठवेल असे बोललो होतो पण मी ती पाठवली नाही. त्यांना दुसरीकडून कुठून तरी ही क्लिप मिळाली. याची माहिती घ्यावी लागेल. नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भेट झाली. तिथे अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. यामध्ये हासुद्धा एक विषय होता. मी त्यांना म्हणालो, मुळात पहिल्यांदा माझे भाषण युपी-बिहारच्या नागरिकांना कळाले. मात्र तुम्हाला कळाले नाही. मी काय बोललो ते तुम्हाला पाठवून देतो. पण ते पाठवायचे राहून गेले होते.

माझ्या भूमिका स्पष्ट
दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनीही भाजप आणि मनसे युतीवर भाष्य केले होते. 'राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु असे ते म्हणाले होते. यावर राज ठाकरेंनी म्हटले की, 'भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका या स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. या सर्व महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मी मांडलेल्या आहे.'

माझ्या व्यक्तींना विरोध नाही, तर भूमिकांना विरोध आहे
राज ठाकरे हे पुढे बोलताना म्हणाले की, माझा विरोध हा भूमिकांना आहे, व्यक्तींना विरोध नाही. माझा नरेंद्र मोदींना विरोध नाही तसेच अमित शहांना देखील माझा विरोध नाहीये, मला वैयक्तिक देणेघेणे नाहीये. ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा विरोध केला आणि ज्या भूमिका पटल्या त्यांबाबत मी अभिनंदनही केले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...