आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची टीका:राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष वाढला; 'मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतरावही', राज ठाकरेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील वक्तव्याचा पुरनरुच्चार केला आहे. तसेच शरद पवार यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेलाही राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले. मी जे बोललो ह्याचा प्रबोधनकार ठाकरे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजावून सांगावे, ४ दिवसांपुर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीचा विषय हा स्वातंत्र्याची ७४ वर्ष आणि ७५ व्या वर्षातील पदार्पण असा होता. या ७४ वर्षाच्या प्रवासात आपण काय गमावलं आणि काय गमावलं याचा उल्लेख या मुलाखतीत होता. यावेळी सांगितले की, आपल्या हातात मोबाईल आले, चांगले रस्ते, चांगल्या गोष्टी घडल्या याला आपण प्रगती माणणार आहोत की, आपण वैचारिक प्रगत होणार आहोत. जेव्हापर्यंत आपण वैचारिक प्रगत होणार नाही तोपर्यंत आपल्या हातात कितीही चांगली गोष्ट आली तर ती प्रगतीची लक्षण नाही. आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का अशा अंगाने आपण ७४ वर्षे मोजली पाहिजे अस मी म्हटले आहे.

'जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. बोललो फक्त मी. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचे घ्यायचं, बाकीचे घ्यायचे नाही असे करता येणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार देखील मी वाचले आहेत”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...