आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Veteran Director Rajdutts 90th Birthday Felicitation And Festival Of His Famous Paintings Will Be Held In Pune On 11th And 12th June.

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची 90 वी:त्यांच्या गाजलेल्या चित्रकृतींच्या महोत्सवाचे पुण्यात 11 व 12 जूनला आयोजन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपट सृष्टीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू तथा राजदत्त यांनी वयाची 90 वर्षे नुकतीच पूर्ण केली. राजदत्त यांच्या अशा अवीट गोडीच्या कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी मिती फिल्म सोसायटीने येत्या शनिवार रविवारी, दिनांक 11-12 जून रोजी राजदत्त महोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच या महोत्सवादरम्यान राजदत्त यांच्याशी मारलेल्या गप्पांच्या माध्यमातून त्यांचा चित्रमय प्रवास उलगडणार आहे. तसेच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली. या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीत त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट, टीव्ही मालिका, माहितीपट साकारले. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले.

मिती फिल्म सोसायटीतर्फे अध्यक्ष मिलिंद लेले, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी आणि सचिव आमोद खळदकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लॉ कॉलेज समोरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) सभागृहात शनिवारी, 11 तारखेला सकाळी 10 वाजता या महोत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर लगेचच 10:15 वाजता पुढचे पाऊल आणि दुपारी 2 वाजता वर्‍हाडी आणि वाजंत्री हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सायंकाळी 5:30 वाजता राजदत्त यांचा सत्कार आणि त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम होईल.

इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते 11 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता राजदत्त यांचा सत्कार करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आदी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राजदत्त यांच्या चित्रमय प्रवासात सहभागी झालेले कलाकार व तंत्रज्ञ यांनाही या सोहळ्यासाठी आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. रविवारी 12 जून रोजी सकाळी 10 वाजता शापित हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...