आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:राजीव गांधीचीच 'संगणक-इंटरनेट' क्रांती, 'कोरोना'संक्रमीत काळात देशात तारणहार ठरली...! 

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राजीव गांधी स्मृती दिनाच्या कार्यक्रमात' प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचे प्रतिपादन..

भारताच्या संगणक व इंटरनेट प्रसाराचा पाया राजीव गांधी यांनी घातला हे 'त्रिवार सत्य' आहे. देशातील तत्कालीन विरोधी पक्षाचा विरोध झेलत राजीव गांधी यांनी संगणकाचा आग्रह धरल्यामुळेच आज आपण संगणक क्षेत्रात  प्रगती करू शकलो आणि हीच "संगणकीय व इंटरनेट प्रणाली" "ऑनलाईन व्यवहारासाठी, "वर्क फ्रॉम होम"साठी आपल्याला "कोरोना संक्रमण काळात "लॉक डाऊन" मध्ये तारणहार ठरली आहे. राजीव गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करताना, त्यांचे हे योगदान लक्षात आल्याखेरीज राहत नाही असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी कात्रज येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी केले.

संगणकाला विरोध करताना "ज्यांनी संसदेवर बैलगाडी मोर्चा आणला"तेच आज स्वतःला डिजिटल क्रांतीचे प्रणेते'(?) म्हणून घेत आहेत, यासारखा दुसरा विनोद नाही असेही त्यांनी नमूद केले. पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ सोनालीताई मारणे, अभिनव शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री राजीवजी जगताप, पीएमपीएमएल कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र खराडे इ नी स्व राजीवजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.. कॉंग्रेस प्रवक्ते व राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री गोपाळ तिवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या प्रसंगी सर्वश्री सेवादल प्रदेश सरचिटणीस श्री हरिदास अडसूळ, विश्वास दिघे, शिवाजी भोईटे, भोला वांजळे, संजय अभंग, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, प्रमोद मारणे, विनायक तामकर, नरसिंहअन्दोली, महेश अंबिके, अशोक काळे, उदय लेले, निलेश साळुंके, गणेश कुरे, इ.. उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...