आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेच्या खिशावर डल्ला:आयकर विभागाकडून देशातील जनतेवर 44 हजार कोटींची दरोडा - खासदार राजू शेट्टी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यापोटी केंद्र सरकारने धारकाकडून एक हजार रुपयांचा जिजीया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर 44 हजार कोटींचा दरोडा पडणार आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (मंगळवारी) व्यक्त केले.

आयकर विभागाने देशातील 44 कोटींहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी?

शेट्टी म्हणाले,केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सदरचा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास 1 हजार रूपये खर्च येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल 44 हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे.

सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड व पॅन कार्ड असण बंधनकारक करण्यात आलेला आहे.केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

जनतेला आवाहन

सरकारच्या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकार पर्यंत पोहचविण्याकरिता रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्वीटर , फेसबुक , इन्स्टांग्रामच्या माध्यमातून पाठवायचा आहे.

तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेल वरती सदर धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.