आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हीच नंबर वन:राज्यसभेतील विजयाचा भाजपकडून पुण्यात जल्लोष; महापालिका निवडणुकीत फायदा होणार असल्याचा दावा

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीच्या विजयाचा भाजपकडून शनिवारी पुण्यात जोरदार जल्लोष करण्यात आला. विशेषतः कोल्हापूरचे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजयाने कार्यकर्ते आनंदी झालेत. थोड्याच वेळ्यात मुंबईतही भाजप कार्यकर्त्यांकडून या विजयाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे.

जादूची कांडी फिरली...

राज्यसभेच्या सहा जगासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एका जागेवर उमेदवार निवडून आले आहेत. पण त्यामध्ये शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांच्या निवडणुकीकडे सर्वांचे पक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वाधिक 33 मते संजय पवारांना, तर भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची 27 मते मिळाली. तसेच दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवरून धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या विजयानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

फुगडी खेळून आनंदोत्सव

पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढे भरविण्यात आले. तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. मुळीक म्हणाले, भाजपच्या या विजयाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेले आहे. फडणवीस यांनी योग्यप्रकारे मतांची बेरीज करत तिसऱ्या पदासाठी उमेदवार कोटा नसतानाही निवडून आणण्यात यश मिळवले. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असतानाही, शिवसेनेने त्याला बाजूला केले त्याला राज्यसभा निवडणूकीच्या माध्यमातून प्रत्युत्तर मिळाले आहे. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही या विजयाचा आम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध पदांच्या निवडणुकीत भाजपचा हाच झंजावात आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिसून येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...