आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीकडून राहुल गांधींची चौकशी:सत्तेचा गैरवापर करत ही लोकशाही मूल्यांचा खून करणारी घटना, रमेश बागवे यांची टीका

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना कट कारस्थान करुन जुन्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. ही बाब सत्तेचा गैरवापर करत लोकशाही मूल्यांचा खून करणारी घटना असल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते रमेश बागवे यांनी बुधवारी पुण्यात केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमलबजावणी संचानालय (ईडी) मार्फत चौकशीसाठी सातत्याने बोलले जात असल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेसतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड ,संगीता तिवारी, माजी महापौर रजनी त्रिभुवन, कमल व्यवहारे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बागवे म्हणाले, देशात महागाई, बेरोजगारी आदी प्रश्न भेडसावत असून त्याबाबत वेळोवेळी राहुल गांधी हे आवाज उठवत आहे. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करत मोदी सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे. मोदी सरकार घाबरलेली दिसत असून ते विनाकारण काँग्रेस नेत्यांना त्रास देत आहेत. 2015 साली नॅशनल हेरॉल्ड प्रकरण फाईल बंद करण्यात आली होती. मात्र ती पुन्हा उघड करून गांधी परिवाराची बदनामी करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. राहुल गांधी यांना अटक केल्यास रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र निदर्शने करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सत्तेचा दुरुपयोग

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांना भाजप घाबरत असल्याने ते ईडीला पुढे करत आहेत. मात्र ,काँग्रेस दबावाला बळी पडणार नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. देशाच्या समस्यावर केंद्र सरकार कोणतेही वक्तव्य करत नाही. त्याच्यामार्फत भाजपचे मंत्री ,खासदार, आमदार यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब संविधानाची पायमल्ली करणारी असून या विरोधात काँग्रेस आगामी काळात आक्रमक लढा देईल.

बातम्या आणखी आहेत...