आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून ठार करून अशी धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी अविनाश बागवे यांच्याकडे मागितली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
व्हॉट्सअप मेसेज, कॉलवरुन धमकी
याबाबत अविनाश रमेश बागवे यांनी खंडणी विरोधी पथकाकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान अविनाश बागवे यांना धमकीचा कॉल आला. अज्ञात आरोपीने अविनाश बागवे यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल आणि मेसेज केला आणि त्यांना धमकी दिली की, 'पिस्तुलातून गोळ्या घालून तुला ठार मारू. निवडणुकीत उभे राहायचे नाही'. तसेच, अविनाश बागवे यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली.
आरोपीचा शोध सुरू
याप्रकरणी अविनाश बागवे यांनी तत्काळ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधत लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर पुढील तपास करत असून अद्याप याप्रकरणात कोणास ताब्यात घेतले नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत आरोपीचा आम्ही शोध घेत असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढू, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित वृत्त
गुंडाराज:महाराष्ट्रात धमक्यांचे सत्र; गृहमंत्री, मंत्री, फडणवीसांची पत्नी, नेते ते सलमान खान टार्गेटवर, मग सामान्यांचे हाल काय?
महाराष्ट्रात रोज एकाला धमकी येत असल्यामुळे राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तीनदा धमक्या मिळाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नींना सुद्धा धमकी आली. अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत ते थेट सलमान खान. या साऱ्यांना धमक्या मिळाल्या. त्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार, असा सवाल निर्माण होत आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.