आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान चालिसा म्हणण्यावरून राजद्रोहाचा गुन्हा:राणा दांपत्याचा मुक्काम तुरुंगातच;  निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवला

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात बंद असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि तळोजा कारागृहात असलेले त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या जामीन याचिकेवर सोमवारी निकाल आला नाही. न्यायालयाने त्यांच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला असून राणा दांपत्याच्या जामीनाबाबतचा निर्णय ४ मे रोजी होणार आहे. गेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबईच्या दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी सोमवारपर्यंत आदेश राखून ठेवला होता. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यावरून राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...