आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणे यांच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण:म्हणाले - असं सांगायच नसतं, मग नॉट रिचेबल राहून काय उपयोग

पिंपरी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसणार असल्याची माहिती असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आपल्या काही समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून शिवसेनेत खळबळ उडाली असताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे. राणे यांच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, ते कुठं आहेत याबाबत असं काही सांगावं लागत नाही. त्याला नॉट रिचेबल असण्याला काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न त्यावेळा नारायण राणेंनी केला.

शिंदे भाजपच्या संपर्कात

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहे. ते भाजपच्या संपर्कात आहेत का? असे विचारल्यावर राणे म्हणाले असं सागंयच नसत मग नॉट रिचेबल राहून काय उपयोग आहे. असे मत नारायण राणेंनी दिले आहे.

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल

शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे. एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेत चिंतेचे वातावरण

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...