आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Rangmanch Pujan At Balgandharva Rangmandir At The Hands Of Deputy Chief Minister Ajit Pawar, State Theater Will Start From Today

बालगंधर्व नाट्यगृहात वाजली घंटा:उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात रंगमंच पूजन, आजपासून राज्यातील नाट्यगृह सुरू

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा धोका पाहता राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे नाट्यगृह देखील बंद होती. आता राज्य सरकारने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या कठोर निर्बंधांनंतर आज सात महिन्यांनंतर नाटकावर पडलेला पडदा आज उठला आहे. राज्यातील नाट्यगृह आजपासून खुली होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे घंटा वाजली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'ही घंटा कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती मात्र जमून गेले. नाटक बघताना जशी घंटा वाजायची तशीच घंटा वाजवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सध्या 50 टक्के उपस्थितीची व्यवस्था आहे. तसेच आता कॉलेज, शाळा सुरु झालेल्या आहेत. दिवाळीच्या नंतर अंदाज आम्ही बघतोय. सध्या सगळीकडेच कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. मात्र तिसरी लाट येऊ नये ही खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. सरकार चालवत असताना हे बंद करा ते बंद करा असे अजिबात आवडत नाही. सगळ्यांना सन्मानाने जगता यायला हवे पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे'

बातम्या आणखी आहेत...