आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गुन्हा:वर्षा देशपांडेंविरोधात खंडणीचा गुन्हा, पाेलिस अधिकारीच सामाजिक कार्यकर्त्यांवर दबाव अाणत असल्याचा अाराेप

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करून कानाखाली मारले व बहिणीला धक्काबुक्की केल्याची तक्रार सातारच्या तमन्ना अमीन मुजावर या विवाहित युवतीने सातारच्या सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या नेत्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्याविरुद्ध दाखल केल्याने चौकशीनंतर सातारा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे व पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे काम करीत असल्याचा आरोप वर्षा देशपांडे यांनी केला असून सातारचे पोलिस उपविभागीय अधिकारी समीर शेख यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

देशपांडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या तमन्ना अमीन मुजावर यांचे म्हणणे आहे की, ऐश्वर्या विठ्ठल जाधव यांनी तमन्नाकडून वेळोवेळी पैसे घेतले होते व ते परत बोलीवर घेतले होते. काही रक्कम ऐश्वर्या जाधव हिने परतही केली होती. मात्र उरलेली रक्कम मागताच ऐश्वर्या जाधव हिने ही तक्रार सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या दलित महिला विकास मंडळाकडे केली. उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख सामाजिक कार्यकर्त्यांची छळवणूक करत अाहेत. याही प्रकरणी त्यांनी तेच केले आहे. त्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी दलित महिला विकास मंडळाच्या वतीने अॅड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.