आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुंडांच्या धमक्यांना कोणत्याही नेत्याने घाबरण्याचे कारण नाही. गुंड टोळीतील एखाद्या कोणी असे काम करत असेल तर, कायदा, पोलिस यंत्रणा आपले काम चोख करेल. याबाबतचे तथ्य समोर आले तर राज्य सरकार त्यांना सुरक्षा वाढवून देईल, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याबाबत रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, आज मी पुण्याचे खासदार गिरीश बापट गेल्यानंतर, त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी याठिकाणी आलो. गेली अनेक वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षात आणि विधिमंडळात एकत्रितरित्या काम केलेले आहे. भाजप पक्षाचा एकनिष्ठ आणि कार्यकर्त्यांना सांभाळणारा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता आमच्यातून निघून गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने फक्त कुटुंबच नाही तर भारतीय जनता पक्षाचे आणि पुणेकरांचे फार मोठ नुकसान झाले आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, जुन्या पिढीतील जाणता नेता गेला. विधानसभा आणि लोकसभेत आम्ही अनेक विषयांवर त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी पुढची पिढी आणि कार्यकर्ते भरून काढतील. कुशल संघटक आणि संसदीय कामकाजाची बारकाईने जाण असलेले नेते म्हणून ते परिचित होते. अनेक वर्षापासून त्यांची खासदार होण्याची इच्छा होती, त्याप्रमाणे प्रथमच ते खासदार म्हणून निवडून आले होते आणि लोकसभेत आम्ही एकत्रित काम करत होतो.
देवेंद्र फडणवीस सक्षम
रावसाहेब दानवे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी ज्यांच्यामुळे दंगली सारखी घटना घडलेली आहे, त्यांच्यावर तपास यंत्रणांमार्फत योग्य ती कारवाई होईल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. राज्यात अशा घटना घडतात त्या घटनांवर आम्ही बोलण्यापेक्षा प्रशासन योग्य ती कारवाई करेल. सदरची घटना दुर्दैवी असून ती कशामुळे घडली याबाबत चौकशी सुरू आहे असेही यावे दानवे यांनी सांगितले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.