आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका तरुणीस खाेटे कारण देऊन फ्लॅटवर नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या साेलापूरचा रहिवासी असलेल्या एका तरुणास न्यायालयाने चार वर्षाचा सश्रम कारावाची शिक्षा सुनावलेली आहे. इस्माईल अब्दुल रेहमान करजगी (वय-43,रा.सहारा नगर, साेलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे.
याबाबत आराेपीवर हवेली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आराेपी इस्माईल करजगी याने फेब्रुवारी 2008 मध्ये त्याचे तक्रारदार एका मैत्रिणीस, तु माझी नवीन मैत्रिण हिला माझे बद्दल चांगले सांगण्यासाठी माझा मित्र कल्याणी याचे आनंदनगर वडगाव येथील फ्लॅटवर चल असे खाेटे बाेलून घेऊन गेला. त्यानंतर त्याठिकाणी पिडित तरुणीस मारहाण करुन तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. ती विवस्त्र असताना आराेपीने ती वस्त्र घालत असतानाचे स्पाय कॅमेराद्वारे तीचे व्हिडिओ क्लीपिंग काढून ती क्लीपिंग अपलाेड करुन ऑरकूट वर सर्वांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच तरुणीच्या लहान बहीणीस उचलून आणीने तिचे ताेंडावर अॅसीड टाकीन, तुझे कुटुंबियांना जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळाेवेळी पैसे उकडून तिचेवर पुन्हा बलात्कार केला.
याप्रकरणी हवेली पाेलिसांनी तपास करत न्यायालयात केसची दाेषाराेपपत्र दाखल केली. त्यानंतर केसची सुनावणी हाेऊन न्यायाधीश एस एस गुल्हाणी यांचे न्यायालयाने आराेपीस भादवि कलम 386 खाली चार वर्षाच्या सश्रम कारावाची शिक्षा सुनावली व पाच हजार रुपये दंड ठाेठवला. तर भादवि कलम 506 (2) नुसार तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि दाेन हजार रुपये दंड शिक्षा सुनावला आहे. या केस मध्ये सरकारी पक्षाचे वतीने सरकारी वकील एस सप्रे यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी म्हणून पाेलिस निरीक्षक (सेवानिवृत्त) सतीश पाटील यांनी कामकाज पाहिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.