आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार:माजी आयएएस अधिकाऱ्यास 5 वर्ष सक्तमजुरी अन् 7 लाखांचा दंड

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यास पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने एका 13 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दाेषी ठरवून पाच वर्ष सक्तमजुरी व 7 लाख रुपये दंडाची शिक्षा शनिवारी सुनावली. मारुती एच. सावंत असे शिक्षा सुनाविण्यात आलेल्या दाेषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात मार्च 2015 मध्ये मारुती सावंत यांच्यावर बलात्कार, विनयभंग, धमकावणे, पाेस्काे कायदा कलम 4,6,8,10, अ‍ॅट्राेसिटी, आयटी अ‍ॅक्ट आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पीडित मुलीशिवाय अन्य तीन मुलींचा छळ करुन विनयभंग केल्याप्रकरणी कृषी खात्यात वरिष्ठ अधिकारी असलेल्या मारुती सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला. मारुती सावंत हे सन 1998 च्या बॅचचे बढती मिळालेले आयएएस अधिकारी असून त्यावेळी ते महाराष्ट्र कृषी व संचलनालय (महाराष्ट्र काैन्सिल ऑफ अॅग्रीक्लचर एज्युकेशन अँड रिर्सच) विभागात डायरेक्टर जनरल पदावर कार्यरत हाेते. त्यांच्यावर संबंधित बलात्काराचा गुन्हा सिंहगड राेड पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे सरकारने निलंबन केले हाेते. याप्रकरणी सरकारतर्फे ज्येष्ठ वकील प्रताप परदेशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली हाेती. अ‍ॅड.परदेशी यांनी याप्रकरणात एकूण 14 साक्षीदार तपासले. संबंधित गुन्हयातील अल्पवयीन पिडित मुलगी फितूर झाल्याने तिने साक्ष फिरवली. मात्र, आराेपीने अल्पवयीन मुलींना दाखवलेल्या ब्लूफ्लिमचा गुन्हा ग्राहय धरुन आयटी कलमानुसार आराेपीस दाेषी धरुन 7 लाख रुपये दंड व पाच वर्षाची कैदेची शिक्षा सुनावल्याची माहिती अ‍ॅड.परदेशी यांनी दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद माेहिते यांनी केला आहे.

मुख्याध्यापिकेने दिली हाेती तक्रार

पीडित मुलगी शिक्षण घेत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापिकेने यासंर्दभात सिंहगडराेड पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली हाेती. पीडित चार मुली एका शाळेतील वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत हाेत्या. शाळेत मुलींच्या समुपदेशनाठी महिला समुपदेशक नेमल्या गेल्या हाेत्या. त्यावेळी मुलींशी संवाद साधताना संबंधित प्रकार उघडकीस आला हाेता. आराेपी मारुती सावंत हा मुलींना त्याच्या फ्लॅटवर बाेलवून चाॅकलेट खाण्यास देण्याच्या अमिषाने त्यांच्याशी अश्लील चाळे करत हाेता. त्यांना संगणकावर अश्लिल फिल्म, फाेटाे दाखवत असल्याचे मुलींनी समुपदेशकांना सांगितले हाेते. तीन वर्षांपासून एका मुलीसाेबत आराेपीने शारिरिक संबंध ठेवल्याची बाब ही उघडकीस आल्याने खळबळ उडाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...