आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:शिवसेना नेत्यावर पुण्यात बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल, लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नाही तर गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे. पुण्यातील दौंड परिसरातील ही तरुणी आहे. कुचिक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे पूर्ण नाव रघुनाथ बबन कुचिक आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणी यांची ओळख नोव्हेंबर 2020 पासून ते 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. या काळात सुरुवातीला ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आरोपी रघुनाथ कुचिक याने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर शिवाजीनगर आणि अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान ही 24 वर्षीय तरुणी गरोदर राहिली. याविषयी माहिती मिळाल्यानंतर आरोपीने तरुणीचा गर्भपात केला. तसेच याविषयी कोणालाही सांगू नये, अन्यथा तुला जीवे मारेल अशी धमकी देखील तिला दिली. हा घडलेला प्रकार पीडित तरुणींने पोलिसांना सांगितला. यानंतर आरोपी रघुनाथ बबन कुचिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...