आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील घटना:टिकी डेटिंग अ‍ॅपवरून झाली ओळख; जेजुरीला नेऊन बलात्कार, दोघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच दोघांची टिकी या डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झाली. दोघांमध्येही संवाद वाढला. या ओळखीचा फायदा घेत एकाने एका महिलेला जेजुरीला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, दोघांवर गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महेंद्र उर्फ रावसाहेब भानुदास गायकवाड (वय 42, रा. मांजराई नगर, पुणे), संतोष पाटील (वय 40, रा कुर्दुवाडी चिखली, पुणे) असे आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी फरार आहेत.

ठार मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडित महिलेची आरोपींशी टिकी या डेटींग अ‍ॅपवरून काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. आरोपींनी तिच्याशी संवाद वाढवून तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, याचा फायदा घेऊन दोघांनी तिला जेजुरीला जाण्यासाठी पुण्यात बोलावून घेतले. यावेळी कारमधून जात असताना आरोपी संतोष याने तिच्याशी जबरदस्ती करून तिला स्पर्श करू लागला. याला पीडितेने विरोध केला. यानंतर महेंद्र गायकवाडने फिर्यादीला त्याच्या मित्राकडे नेत त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. तसेच अनैसर्गिक कृत्यही केले. या सोबतच पुन्हा शरीर संबंध ठेव नाही तर मारून टाकेन अशी धमकीही दिली.

आरोपींचा शोध सुरू

पीडितेने हडपसर पोलिस ठाणे गाठत पोलिसांपुढे सर्व आपबिती सांगितली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या सोबतच या प्रकारच्या डेटींग अ‍ॅपचा वापर करतांना मुली आणि महिलांनी सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...