आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडीलांकडून 19 वर्षीय मुलीवर बळजबरीने बलात्काराचा प्रयत्न:स्वत:ची कशीबशी केली सुटका, नराधम पित्यास अटक

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील चंदननगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका कुटुंबातील नराधम वडीलांनीच स्वत:च्या 19 वर्षीय मुलीवर बळजबरीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित मुलीने बापाच्या तावडीतून पळ काढत थेट चंदननगर पाेलिस ठाणे गाठत वडीलांविराेधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी नराधम वडीलांना अटक केली आहे. अशी माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली आहे.

चंदननगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत एक उच्चभ्रु साेसायटी असून सदर ठिकाणी पीडित तरुणी राहण्यास आहे. दहा सप्टेंबर राेजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सदर पीडित तरुणी व तिचे वडील असे दाेघेच राहत्या घरात हाेते. त्यावेळी वडीलांनी तिला हातास धरून जवळ ओढून तिला बेडरूममधील बेडवर ढकलून देवून बेडवर झाेपवून तिच्याशी अश्लील चाळे सुरू करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले.

कशीबळी केली सुटका

मुलीने त्यास विराेध करत वडीलांना ढकलून देत स्वत:ची कशीबशी सुटका केली. त्यानंतर भेदरलेल्या अवस्थेतच तिने चंदननगर पाेलिस ठाणे गाठत पाेलिसांकडे वडीलांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत माहिती देत वडीलांविराेधात तक्रार दाखल केली. पाेलिसांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेत पीडित मुलीच्या घरी जाऊन नराधम पित्यास अटक केली आहे. याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस पालवे पुढील तपास करत आहे.

सावत्र मामाकडून भाचीवर बलात्कार

काेंढवा पाेलिस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलगी घरात एकटी झाेपलेली असताना सावत्र मामा घरी येऊन त्याने तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे आणि घरातील लाेकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काेंढवा पाेलिसांनी 30 वर्षीय सावत्र मामाला अटक केल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली. ही घटना मार्च 2022 मध्ये घडल्याची तक्रार पीडित तरुणीने पाेलिसांना दिली आहे.

तरुणीने सावत्र मामाला प्रतिकार केला असता, त्याने याबाबत काेणाला काही सांगितल्यास घरातील लाेकांना मारून टाकण्याची धमकी दिली हाेती. त्यामुळे पीडित तरुणीने घाबरून याबाबत लवकर तक्रार केली नव्हती. परंतु मामा तिला वारंवार धमकावत असल्याने अखेर तिने पाेलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...