आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत नोकरीच्या आमिषाने महिलेवर बलात्कार:नंतर 9 लाखांची फसवणूक, कोथरुड पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार करुन तिची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (रा. मु पो. मेढा, जावळी, सातारा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत महिलेशी आरोपी पवार याची जानेवारी २०१९ मध्ये ओळख झाली होती. आरोपी पवारने महिलेला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. तिच्याकडून वेळोवेळी आठ लाख ६८ हजार रुपये पवारने उकळले.त्यानंतर पवारने महिलेवर बलात्कार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करत आहेत.महापालिकेत नोकरीच्या आमिषाने महिलेवर बलात्कार तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी संतोष पवार याच्या विरोधात यापूर्वी अशाच प्रकारचा एक गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याने एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला होता. सदनिका खरेदी करुन देण्याच्या बतावणीने त्याने तिच्याकडून लाखो रुपये उकळले होते.

पत्ता विचाण्याच्या बहाण्याने सोन्याचे ब्रेसलेट चोरले

नातेवाईकाच्या लग्नसमारंभाहून परतताना दुचाकीस्वार चोरट्यांनी एकाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून त्यांच्या हातातील ४५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. ही घटना ३० डिसेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास धानोरी खदानसमोर घडली. याप्रकरणी ५९ वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.फिर्यादी हे ३० डिसेंबरला नातेवाईकाच्या लग्नसमारंभानंतर दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने धानोरी खदान परिसरात अडविले. त्यानंतर त्यांच्या हातातील ४५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गेंड तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...