आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्‌सअप चॅटिंगद्वारे ओळख झाल्यानंतर लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ७ वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावली. दंडापैकी ७५ हजार रुपये पीडितेला देण्यात यावेत, दंड न दिल्यास त्याला अतिरिक्त तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पीडितेचे वय आणि आरोपीने निर्दयीपणे केलेल्या लैंगिक शोषणाचा विचार करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील चंद्रकिरण साळवींनी केला.

आकाश गुलाब यादव (२१, रा. शिवणे,पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित १७ वर्षीय मुलीने हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. १३ फेब्रुवारी ते १५ सप्टेंबर २०१५ या कालावधीत त्याच्या घरी, एका दुकानात आणि डोणजे येथील एका लॉजवर ही घटना घडली. पीडितेच्या मित्राकडून त्याने तिचा मोबाइल क्रमांक मिळवला. व्हॉट्‌सअपवर मेसेज करून ओळख करून घेतली. लग्न आणि बदनामीच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...