आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक:पुण्यात एकतर्फी प्रेमातून नवविवाहित तरुणीवर बलात्कार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून 26 वर्षीय नवविवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तसेच तरुणीचे अश्लील फाेटाे तिच्या पतीस पाठवून तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पाेलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आराेपीस गुरुवारी अटक करण्यात आली.

शिक्षण घेताना ओळख

अविनाश पांडुरंग करगळ (वय 26, रा. चांदाेर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश करगळ व पीडित तरुणी औरंगाबाद येथे एमसीएचे एकत्र शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर एमसीएच्या तीन महिन्याचे इंटरर्नशिपकरिता महाविद्यालयाचे काही विद्यार्थी पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका कंपनीत रुजू झाले होते.

फोटो व्हायरलची धमकी

संशयित तरुणाने तरुणीला पुण्यातील वाकड ब्रीज जवळील हाॅटेलमध्ये नेत तिच्यासाेबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. तसेच दाेघांचे एकत्र असे अश्लील फाेटाे माेबाइलमध्ये काढले. नंतर ते फाेटाे पीडित तरुणीच्या पतीला पाठवण्याची धमकी देवून, तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली असता तरुणीने त्यास विराेध केला.

ब्लॅकमेल करणे सुरू

मात्र, आरोपीने तिला संबंधित दाेघांचे नग्न अवस्थेतील फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत डाेंगे चाैक थेरगाव येथील एका हाॅटेलवर मे 2022 मध्ये घेवून जावून तिचे इच्छेविरुध्द तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर सुध्दा वेळाेवेळी तरुण हा विवाहितेला ब्लॅकमेल करत तिला शरीर संबंधाची मागणी करू लागला. तसेच तिच्या पतीला अश्लील फाेटाे पाठवून तुझी बदनामी करेल अशी धमकी तिला दिली. याप्रकरणी तरुणीने गुरुवारी पाेलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आराेपीला तात्काळ पाेलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुढील तपास हिंजवडी पाेलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...