आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:नग्नावस्थेत घरात शिरून युवतीचा विनयभंग

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबीयांच्या घरात ९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास एक २७ वर्षीय तरुण नग्न अवस्थेत बळजबरीने शिरला. त्याने कुटुंबातील १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तिच्या ३५ वर्षीय वडिलांना शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रकार केला. त्याचसोबत पीडित मुलीच्या आत्याच्या हातावर कोणत्या तरी वस्तूने मारून तिला जखमी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात आरोपी विनय दत्तात्रय वाघमारे (रा. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. याबाबत पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...