आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:विवाहाच्या आमिषा दाखवत तरुणीवर बलात्कार; एकाच्या विरोधात गुन्हा

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवप्रसाद विठ्ठलराव दुधाटे (३५,रा. उमरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. दुधाटेने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने नकार देत फसवणुक केली.

बातम्या आणखी आहेत...