आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एफटीआयआयच्या आवारातील प्रभात स्टुडिओ मध्ये ' रामशास्त्री या चित्रपटाशी संबंधित दुर्मिळ दस्तावेज तब्बल ७६ वर्षांनी सापडला. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनने रामशास्त्री चित्रपटाला दिलेले ‘१९४४चा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट’ हे प्रशस्तीपत्र मिळाले आहे. हे प्रशस्तीपत्रक आता प्रभात चित्रपट संग्रहालयात ठेवले जाणार आहे.
प्रभात स्टुडिओमध्ये साफसफाईचे काम सुरू असताना कला दिग्दर्शन आणि निर्मिती आरेखन विभागातील सहायक प्राध्यापक आशुतोष कविश्वर यांना हे प्रमाणपत्र सापडले आहे. प्रभात फिल्म कंपनीतर्फे ३० जून १९४४ रोजी प्रदर्शित झालेल्या रामशास्त्री या सिनेमाने इतिहास रचला. सत्य, न्याय आणि समता या विषयावर आधारित हा चित्रपट विशेष ठरला. त्या काळी चरित्रविषयक मांडणी करणारे चित्रपट प्रदर्शित होत नसत. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन कोलकाता या संस्थेने १९४४ मध्ये चित्रपट, हिंदी चित्रपट, पटकथा लेखन, संवाद लेखन, लेखक, दिग्दर्शन, अभिनेता आणि सहायक अभिनेता अशा सात विभागांच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी चित्रपटाला नामांकन दिले. चित्रपटाने सर्व पुरस्कार पटकावले.या चित्रपटातील गजानन जहागिरदार यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच १९६१मध्ये तत्कालीन फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पहिले प्राचार्य म्हणून जहागिरदार यांची नियुक्ती झाली होती. प्रभातच्या दृष्टीने हा खजिना आहे. या प्रशस्तीपत्रकाचे योग्य पद्धतीने जतन केले जाईल, असे संग्रहालयाचे व्यवस्थापक नितीन पत्की यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.