आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:हृदयाच्या दुर्मिळ शस्त्रक्रियेने बालकास जीवदान, 14 दिवसांच्या चिमुरड्यास बसवले कायमस्वरूपी पेसमेकर

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ कार्डिआे थाेरॅसिक सायन्स ही संस्था हृदय आणि श्वासाेच्छ्वासाबाबत संशाेधन करण्यात प्रसिद्ध आहे. या संस्थेच्या रुग्णालयात १४ दिवसांच्या बालकावर गुंतागुंतीची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून त्यास कायमस्वरूपी पेसमेकर बसवत जीवनदान देण्याचा प्रयत्न केला.

भारतीय लष्करातील एका जवानाच्या नवजात बालकाच्या हृदयाच्या स्पंदनचा वेग अतिशय कमी हाेता. तसेच मूल जन्मल्यापासून हृदयात ब्लाॅकेज असल्याने हृदयाचे कार्य सुरळित हाेत नव्हते. सुमारे २२ हजार बालकांत अशाप्रकारे एक बालक जन्मास येत असतेे. अशा बालकांवर तातडीने शस्त्रक्रिया हाेणे गरजेचे असते, नाहीतर ते जिवावर बेतू शकते. या बाळाला कार्डिआे थाेरॅसिक सायन्स संस्थेत दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया केली आणि बाळाच्या हृद्यात कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आले. अशाप्रकारची शस्त्रक्रिया ही अवघड आणि दुर्मिळ असते व ती करण्यात बहुतांश अपयश येत असते. या मुलात हृदय शस्त्रक्रिया केल्यानंतर ही हृदयाची गती वाढू न शकल्याने डाॅक्टरांनी कायमस्वरूपी पेसमेकर लावत हृदयास कृत्रिम पद्धतीने गती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डाॅक्टरांनी शस्त्रक्रियावेळी स्थायी पेसमेकर पाेटातील एका भागत प्रत्याराेपण करून त्यानुसार हृदयाची गती नियंत्रित केली आहे. सदर संस्थेच्या डाॅक्टरांना शस्त्रक्रियेत यश आल्यानंतर आणि मुलाची तब्येत व्यवस्थित झाल्यावर त्यास रुग्णालयातून घरी सुखरूप सोडले.

बातम्या आणखी आहेत...