आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडली होती. या प्रकरणी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. त्यांनीच मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचे दोषारोप ठेवत त्यांची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात येत होती.
शिंदे सरकार आल्यावर त्यांचावरील फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप मागे घेण्यात आले होते. यामुळे त्यांना या प्रकरणी दिलासा मिळाला असे बोलले जात होते. मात्र, पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाचा हा निर्णय शिंदे -फडणवीस सरकारला धक्का मानण्यात येत आहे.
रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असतांना राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांचा समावेश होता. हे प्रकरण राज्यात गाजले होते.
या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात बंडगार्डन पोलिसात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शहर पोलिस तपास करत होते. परंतु, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांचा तपास पोलिसांनी बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो आज फेटाळून लावला.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये सेवेत आहेत. सत्ता बदल झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे त्यांच्यावरील चौकशी थांबण्यासाठी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.