आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण:रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटलेच नाही : आदित्य ठाकरे

प्रतिनिधी | पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर कुणी काही टाकेल. त्यावर विश्वास ठेवता येत नाही. रश्मी ठाकरे व तेजस ठाकरे यांच्यात मुख्यमंत्र्यांसोबत कुठलीही भेट झाली नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिले. तसेच त्यांनी पुण्यातील वेताळ टेकडी वाचली पाहिजे, अशी भूमिकाही मांडली.

‘महाविकास आघाडी ही कोणत्याही पदासाठी, सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी एकवटलेली नाही. ती लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. वज्रमूठ सभा संविधान रक्षणासाठी असून, आघाडी भक्कमपणे काम करत असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.’ राज्यातील वेदांता वा एअरबससारखे प्रकल्प गुजरात वा अन्यत्र हलवले. नको असलेले लादताय, असे ते म्हणाले.