आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्र बराटेला अटक:वर्षभरापासून फरार असलेला रवींद्र बराटे अखेर अटकेत, दुसऱ्यांचे गैरव्यवहार उघडकीस आणणारा बराटेच होता 3500 कोटींचा मालक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटेला अखेर अटक करण्यात आली आहे. खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल जवळपास वर्षभरापासून तो फरार होता. बराटेंसह त्यांच्या 13 साथीदारांविरोधात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई सुरू करुन 11 जणांना अटकही केली होती. एकेकाळी राज्यातील मोठ्या नेत्यांच्या जमिनींचे संशयास्पद व्यवहार चव्हाट्यावर आणणारा बराटे स्वतःच फसवणूक आणि खंडणीच्या आरोपात अडकला. याच कारणामुळे त्याला फरार व्हावे लागले.

माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. त्याने कित्येक राजकारणी आणि बड्या उद्योजकांना अडकवले आहे. पत्रकार परिषदा घेऊन माहिती जारी करायचा. त्याच्या माहितीच्या आधारे अनेकांवर कारवाई सुद्धा झाली. पण, याच अधिकाराचा वापर करून त्याने लोकांची फसणूक, खंडणी आणि बेकायदा सावकारी केली असे आरोप लागले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा जवळपास साडे तीन हजार कोटींचा मालक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी सुद्धा पोलिसांनी केली होती.

3500 हजार कोटींचा मालक बराटे

रवींद्र बराटेच्या विरोधात पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध बेकायदा सावकारी करण्यासह आर्थिक फसवणूक, खंडणी आणि धमकीचे आरोप करण्यात आले. त्यानंतरच तो फरार झाला. सर्वप्रथम पुण्यातील कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये बराटेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्या घरी छापे टाकून शेकडो फायली जप्त केल्या. त्यामध्ये राजकारणी व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, शासकीय ठेकेदार यांच्याशी संबंधित असलेल्या फायलींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...