आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे. धंगेकरांनी महात्मा फुले संग्रहालय येथे येत बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यासोबत अंकुश काकडे देखील उपस्थित होते.
दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांची पोटनिवडणुकीच्या वेळेला भेट घेतली असती तर भाजपने बापटांवर संशय घेतला असता असे म्हटले आहे. तर त्यांनी कधी कुरघोडीचे राजकारण केले नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असून रवींद्र धंगेकरांना अडचण येईल तेव्हा मला सांग मी मदत करेन, असे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले आहे.
मविआने आणि भाजपने कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गिरीश बापट आणि त्यानंतर मुक्ता टिळक यांच्यानंतर आता 28 वर्षांनंतर पुण्यातील कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्यामुळे काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
पुणे शहरातील 2009 आणि 2014 च्या कसबा विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांना चांगलीच फाईट दिली होती. यापूर्वी धंगेकर आणि गिरीश बापट यांच्यात अनेक वेळा आरोप - प्रत्यारोप सुरू होते. भाजपच्या रासने यांचा धंगेकरांनी पराभव केल्यानंतर त्यांनी मागील अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
भाजपने त्यांच्यावर संशय घेतला असता
रवींद्र धंगेकर म्हणाले की, 'गिरीश बापट यांनी कधीही कुरघोडीचे राजकारण केले नाही. निवडणूक काळात ते आजारी होते. मी पोटनिवडणुकीत भेटलो असतो तर भाजपचा त्यांच्यावर संशय आला असता'. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर गिरीश बापट यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो, असेही धंगेकरांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.