आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा पाेटनिवडणूकीतील विजयानंतर रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना प्रत्यूत्तर दिले आहे. दादा.. मी रविंद्र धंगेकर असे म्हणत चंद्रकांत पाटलांच्या खोचक प्रश्नाची धंगेकरांनी खिल्ली उडवली. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी रविंद्र धंगेकर कोण? असा खोचक सवाल महाविकास आघाडीला विचारला होता.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे ज्येष्ठ नेते असून त्यांना माहिती आहे कार्यकर्ता कसा जपायचा असतो. कसबा निवडणूकीत फिरताना त्यांचे म्हणणे हाेते की,कसबा निवडणुकीत फिरताना मी इकडे गेलाे की रवी धंगेकर, तिकडे गेलाे तरी धंगेकर.. हु इज धंगेकर? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. त्यानंतर या प्रश्नाला रवींद्र धंगेकर यांनी खरपूस प्रत्यूत्तर दिले आहे. कसबा निवडणूकीच्या विजयानंतर आमदार रविंद्र धंगेकर शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बाेलत हेाते.
धंगेकर म्हणाले, संधीचे साेने करणारा मी कार्यकर्ता आहे. आव्हाने स्विकारणारा मी कार्यकता असून आयुष्यात दरराेज नवीन आव्हानांना समाेरे जाण्याची ताकद मला मिळते. माझी काेणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून शून्यातून मी माझे विश्व तयार केले आहे. माझे आईवडील साधे असून आईला अजून समजले ही नाही की मुलगा आमदार झाला आहे.
वडीलांचे संस्कार माझ्यावर हाेते. त्यांनी सांगितले की, राजकारणात डाेके शांत ठेवले पाहिजे. तुमच्याकडे येणाऱ्या माणसाचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. काम नाही झाले तरी अपमानित न होता गाेड बाेलून काम करत राहिले पाहिजे, लाेक तुला साेडणार नाही. त्यामुळे माझे काम मी सदैव करत राहिलाे.पाचवेळा नगरसेवक पदावर निवडून आल्याने मनपातील भ्रष्टाचार, लाेकांच्या समस्या सातत्याने मांडत राहिलाे. मी लढणारा कार्यकर्ता असून एकाजागी न बसता किंवा काेणत्याही आव्हानांना सामाेरे जाण्यास तयार आहे.
भाजप तळागाळाला गेला
पुढे ते म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील लाेकांशी माझी हजाराे नाती तयार झाली असून त्यांचा पाठिंबा मला मिळत गेला. राज्यात अनेक दिग्गज नेत्यांनी सर्वसमावेशक काम केले परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकास न दिसता समाेरील व्यक्तीस नेस्तानाबूत करत आहे. यामुळे भाजप पक्ष तळागाळला नेण्याचे काम ते करत आहे. मतदार राजा असून त्यास सूडाचे राजकारण आवडत नाही.
दुचाकीवर फिरणाराच धंगेकर हवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले की, आतापर्यंत रवी धंगेकर याने केलेल्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यास कसबातील मतदारांनी संधी दिली आहे. परंतु आम्हाला आमदार रवी धंगेकर नकाे तर एक मार्चपर्यंत दुचाकीवर फिरणारा धंगेकरच पाहिजे आहे. लाेकांच्या सुख दु:खात ज्याप्रकारे ताे आतापर्यंत सहभागी हाेत हाेता, तीच परंपरा यापुढील काळात त्याने जपावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.