आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला विश्वास:म्हणाले- 15 हजार मतांच्या फरकाने माझा विजय निश्चित, शेवटपर्यंत आघाडीवर राहणार

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 हजार मतांच्या फरकाने माझा विजय निश्चित होणार, असा दावा कसबा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच माझा विजय निश्चित झाला होता. परंतु निवडणूक प्रक्रिया असल्याने सोपस्कार पार पाडावे लागले, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मीच आघाडीवर राहणार

रवींद्र धंगेकर म्हणाले, ज्या दिवशी महाविकास आघाडीने माझ्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली, त्याचदिवशी माझा विजय निश्चित झाला होता. आज मतमोजणीनंतर 15 हजारांहून अधिकच्या मताधिक्यांनी माझा निश्चित विजय होईल. असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला. शेवटपर्यंत 25 हजारांची लीड राहिल. दुसऱ्या फेरीपासून मी आघाडीवर आहे, आणि हाच माझा विजय आहे. शेवटच्या फेरीपर्यंत मीच आघाडीवर राहणार.

हे आहेत निकालाचे अपडेट

कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत मतमोजमीच्या सहा फेऱ्या पार पडल्या आहेत. कसब्यात मविआचे रविंद्र धंगेकर हे जवळपास 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनीही 3 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे. वाचा सविस्तर

सत्तांतरानंतर विधानसभेची पहिली निवडणूक

कसबा व चिंचवड या दोन्ही मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला असून त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आजचा निकाल महत्त्वाचा मानला जातोय.

बातम्या आणखी आहेत...