आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PMPMLचा संप त्वरित मिटवण्याचा प्रयत्न करा:आमदार धंगेकरांची बकोरीयांकडे मागणी; पुणेकरांना वेठीस धरणे खपवून घेणार नाही

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात सार्वजनिक बस वाहतूक करण्यात बसेसचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची भेट घेऊन सोमवारी केली.

सध्या दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असून त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य पुणेकरांनाही या संपामुळे अतोनात त्रास होत आहे. त्यामुळेच कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारणाऱ्या या ठेकेदारांवर त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, या ठेकेदारांच्या थकीत बिलांसंदर्भात संबंधितांशी तातडीने चर्चा करून प्रश्न मिटवावा. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्यशासन यांच्याशी यासंदर्भात तातडीने चर्चा करून हा प्रश्न मिटविण्याचे प्रयत्न करत असल्याचे यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी सांगितले.

पुणे मनपात आमदारकीच्या कामाचा श्रीगणेशा

नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन आमदारकीच्या कामाचा श्रीगणेशा केला. पुणेकरांच्या मिळकत करात ४० टक्के सूट द्यावी, मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारू नये, पेठांच्या भागांमध्ये समानदाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन करावे. अशा विविध मागण्यांसंदर्भात कसबा मतदारसंघाचे आमदार धंगेकर यांनी सोमवारी पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्यासोबत प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस वीरेंद्र किराड, प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी रमेश अय्यर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी धंगेकर म्हणाले की, संपूर्ण देशात पुण्यात मिळकत कर सर्वाधिक असून नागरिकांना मिळकत करात ४० टक्के सवलत देऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारला जाऊ नये. त्यामुळे छोट्या सदनिका धारकांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात विधीमंडळात मी प्रश्न उपस्थित करणार असून राज्यशासनाकडे त्याचा मी पाठपुरावा करेन. असे सांगून ते म्हणाले की, याबरोबरच पेठांच्या भागांमध्ये दाट वस्ती असून तेथे पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सुरळीत पाणीपुरवठा होण्याकरिता योग्य नियोजन करून आमलात आणावे अशी मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

बातम्या आणखी आहेत...