आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या अनुष्का पारीखने 5 सेकंदात उचलले 100 किलो वजन:इंटरनॅशनल बुक्स ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील 19 वर्षीय अनुष्का वैभव पारीख हिने 5 सेकंदात 100 किलो वजनाची डेडलिफ्ट यशस्वीरीत्या उचलून इंटरनॅशनल बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठात लिबरल आर्ट्स शाखेतील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असलेली अनुष्का कमीत कमी वेळेत सर्वात वजनदार डेडलिफ्ट करणारी भारतातील सर्वात लहान वयाची स्पर्धक ठरली आहे. यापूर्वी तिने 2018 मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन या खेळात रौप्यपदक जिंकून भारताचे नाव भूषविले आहे.

अनुष्काने वर्ल्ड बुक्सच्या ऑनलाइन जागतिक स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये स्पर्धक शरीरिक वजनाच्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वजन उचलण्यासाठी अर्ज करू शकतात. प्रक्रियेनुसार, सहभागींना एक फॉर्म भरावा लागतो आणि रेकॉर्डसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. एकदा नोंदणी केल्यानंतर, सहभागींनी आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी किमान सेकंदात उचललेल्या वजनाचा दावा करावा लागतो, ज्याचे आंतरराष्ट्रीय ज्यूरीद्वारे मूल्यांकन केले जाते. ज्युरीने मान्यता दिल्यानंतर रेकॉर्ड धारकाला त्यांच्या लोगोसह कोरलेले सुवर्णपदक प्रदान केले जाते. यामध्ये 55-60 किलो वजनी गटात सहभागी होत, अनुष्काने अवघ्या 5 सेकंदात 100 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले.

या यशाबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली, “ गेल्या दीड वर्षापासून मी वजन उचलत आहे. माझ्याकडे डेडलिफ्टमध्ये 90 किलोचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे, ज्याची 2021 मध्ये इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. हा विक्रम 9.25 सेकंदात साध्य करण्यात आला होता. यापुढे 5 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 110 किलो डेडलिफ्ट’चा मी निर्धार केला असून, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.’’

अनुष्का म्हणाली...

या विक्रमासाठी मिळालेल्या सहकार्याबाबत अनुष्का म्हणाली, “ मला माझी आई शिल्पा पारीख स्वतः पॉवर-लिफ्टर आणि फिटनेसबाबत उत्साही असलेले व्यक्तीमत्व आहे, त्यांच्याकडून नेहमीच प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्रम धारकांसह मी गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धेची तयारी करत होते.”

बातम्या आणखी आहेत...