आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआराेग्य विभागासह इतर विभागांची परीक्षा घेणे अवघड काम आहे. एमपीएससीला विविध परीक्षांच्या हजाराे उमेदवारांची परीक्षा घेण्याची असते. शासनाने निर्णय घेतल्यानंतर पारदर्शकपणे अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. मात्र, आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांना आराेग्य विभागाची परीक्षा दाेनवेळा पुढे ढकलावी लागली. याप्रकरणात दोषींवर एवढी कठाेर कारवाई करण्यात येईल की, पुन्हा काेणत्याही भरती परीक्षेत घाेटाळा करण्याचे धाडस काेणी करणार नाही. साेमवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आराेग्य विभागाच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्हा काेराेना आढावा बैठक शुक्रवारी कौन्सिल हाॅल येथे घेण्यात आल्यानंतर ते बाेलत हाेते. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त साैरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषद सीईआे आयुष प्रसाद उपस्थित हाेते.
पवार म्हणाले, काेविड संदर्भात आढावा घेण्यात आलेला असून आेमायक्राॅन नवीन विषापणूच्या अनुषंगानेही माहिती घेण्यात आली. आेमायक्राॅनचे रुग्ण वेगवेगळया देशातून राज्यात आले असून त्यांची परिस्थिती नियंत्रित आहे. राज्यात पुणे मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर लसीकरणात आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्ये करावीत
भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईचे महापाैर किशाेरी पेडणेकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यासंदर्भात अजित पवार म्हणाले, आपण सुसंस्कृत महाराष्ट्र समजताे, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावर आहे. मुंबई महापाैर यांच्याबाबत अश्लील टिका करण्यात आली त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली त्यामुळे याबाबत राजकारण येण्याचा प्रश्न नाही. लाेकांसमाेर बाेलताना आपण स्वत:वर नियंत्रण ठेवले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.