आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Road Accident In India Survey | Reducing The Speed Of Vehicles In Accident prone Areas Reduces The Number Of Deaths By 38 Percent

देशभरात सर्वेक्षण:अपघातग्रस्त भागात वाहनांचा वेग कमी केल्यास 38 टक्के मृत्यू कमी; जखमींचे प्रमाणही 27 टक्क्यांनी घटले

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पादचाऱ्यांना रस्ते ओलांडताना स्वत:चा जीव धाेक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते अशा दिल्ली, पुणे, बंगळुरू आदी भागातील दहा अपघातग्रस्त ठिकाणांची निवड रस्ते सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या सेव्हलाइफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केली. या ठिकाणचे अपघात कमी करण्यासाठी त्यांनी सदर भागातील रस्त्यांच्या डिझाइनची पुनर्रचना केली.

यामध्ये अपघातग्रस्त भागात वाहनांचा वेग ४५ किलाेमीटर प्रतितासावरून ३५ किमी/प्रति तास कमी झाला. परिणामी वाहनांचा वेग कमी झाल्यामुळे पादचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत कमी झाले असून अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही ३८ टक्क्यांनी घटले, तर जखमींचे प्रमाणही २७ टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष समाेर आला आहे.

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयामार्फत साेमवारी सेव्ह लाइफ फाउंडेशनचा ‘टॅक्टिकल रिडिझाइन ऑफ डेंजरस इंटरसेक्शनस’ हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. महामार्गावरील शहरी भागातील अपघातग्रस्त ठिकाणच्या रस्त्यांच्या डिझाइनची पुनर्रचना करून कमी किमतीच्या तात्पुरत्या बदलांचा वापर यासाठी करण्यात आला.

असुरक्षित रस्ते पादचाऱ्यांकरिता सुरक्षित करण्यासाठी अपघातप्रवण भागात रस्त्याच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून रिडिझाइन करण्यात आले. दिल्लीतील गांधी विहार, भालस्वा चाैक, बुरारी चाैक, राजघाट इंटरसेक्शन, पुणे परिसरातील कार्ला फाटा, उंड्री चाैक, कान्हे फाटा, एन्ड्युरन्स चाैक, खडी मशीन चाैक व बंगळुरूमधील पेनियल स्कूल परिसर या ठिकाणी याबाबतच्या चाचण्या घेण्यात आल्या.

सेव्हलाइफ फाउंडेशनच्या देशभरातील सर्वेक्षणातील निष्कर्ष; रस्त्यांच्या डिझाइनची पुनर्रचना रस्त्यांचे रिडिझाइन करून चाचणी घेतली सेव्हलाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष पीयूष तिवारी यांनी सांगितले की, सर्व प्रकारचे रस्ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित असणे महत्त्वपूर्ण आहे. यादृष्टीने अपघातप्रवण भागातील रस्ते कशा प्रकारे सुरक्षित करता येईल यासाठी संबंधित दहा भागातील रस्त्यांचे डिझाइन करून चाचणी घेण्यात आली आहे. याद्वारे अपघातग्रस्त भागातील ठिकाणांवर उपाययाेजना करण्यात याव्यात हा आमचा उद्देश हाेता. त्याबाबतची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...