आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखकास 10 लाखांचा गंडा:चित्रपटावरील हक्क सोडण्यावरून वाद, निर्मात्यासह 5 जणांना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका चित्रपटावरील हक्क सोडण्यावरून झालेल्या वादानंतर चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटाच्या लेखकास दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी निर्मात्यासह पाच आराेपींना रविवारी संध्याकाळी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर भेडेकर (वय २९) असे तक्रारदार चित्रपट लेखकाचे नाव आहे. ते परभणीमधील गंगाखेड येथील रहिवासी आहेत. तर, चित्रपट निर्माते लिंबाजी मुंढे (वय ३८) यांच्यासह संग्राम मुंढे (वय २६), ज्ञानेश्वर बजरंग सकट (वय १९ ,रा. पुणे), सुमित कदम (वय २३,रा. पुणे) आणि अमर वाघमारे (वय ३०,रा. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शंकर भेडेकर हे चित्रपट लेखक असून त्यांची आराेपींशी ओळख आहे. पकवाज या फिल्मचे लेखन त्यांनी केले आहे. या चित्रपटासाठी लिंबाजी मुंढे यांनी सुमारे ४० लाख रुपये गुंतवणूक केली हाेती. चित्रपटापूर्वी दोघांमध्ये चित्रपटाच्या हक्काबाबत व्यवहार ठरला होता. मात्र, चित्रपट बनवल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला. ४ जून राेज शंकर भेडेकर हे आराेपींना भेटण्याकरिता साेमटणे फाटा परिसरातील हाॅटेल किनाराच्या मागे गेले होते. तेथे त्यांना लिंबाजी मुंढे, संग्राम मुंढे व त्यांच्या आठ ते दहा साथीदारांनी धमकावले व त्यांच्या ताब्यातील दहा लाख रुपये राेख, समंतीपत्र, चित्रपटाचे हक्कसाेड पत्र व पकवाज या चित्रपटाच्या सहा हार्डडिस्क दगडांचा धाक दाखवून पळवून नेल्या. पुढील तपास तळेगाव दाभाडे पाेलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...