आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Relief And Rehabilitation Minister Vijay Vadettiwar's Demand For Resignation, Warning Of Agitation If The Result Of Maratha Reservation Goes Against

मराठी क्रांती मोर्चा आक्रमक:मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी, मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेला तर आंदोलनाचा इशारा

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल

सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्च्याने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. निकाल विरोधात गेला तर 9 ऑगस्टपासून मराठा क्रांती मोर्चा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध पाळून रस्त्यावर उतरेल,' असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. यासोबतच  पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून क्रांती मोर्चाने दिला आहे. सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मराठा क्रांती मोर्चाने हल्ला चढवला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने ही मागणी केली. 

मराठा क्रांती मोर्चाने या पत्रकार परिषदेत सांगितलं की, राज्यातील 3 पक्षाच्या सर्कसमुळे मराठा समाजावर अन्याय होण्याची शक्यता आहे. सारथी समितीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 'सारथी'विषयी एक समिती नेमण्यात आली. त्यानंतर अहवाल आला. परत दुसरी समिती नेमली. मात्र हा अहवाला समोर मांडला जात नाही. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्याकडून या खात्याचा कारभार काढून घेण्यात यावा अशी मागणीही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

पुढे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले की, गेल्या वेळच्या सरकारकडून आमच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. आता विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता, तो पाठण्यात यावा असेही यावेळी पत्रकारपरिषदेत सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाने म्हटले की, 'सारथीच्या प्रश्नावरून आंदोलन झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठवलं होते. तेव्हा 15 दिवसांत प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र 6 महिने उलटल्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. जर आरक्षणाबाबत दगा फटका झाला तर मराठा समाज आक्रोश करेल असा इशारा त्यांनी दिला. 

बातम्या आणखी आहेत...