आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • A 28 year old Girl Was Repeatedly Abused By 'she' In Pune, Even Among Her Relatives, Who Lured Her Into Marriage Without Being Vulnerable; Threatening To Make Offensive Videos Go Viral

पुण्यात 'ती' नातेवाईकांमध्येही असुरक्षितच:लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर अनेकदा अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नातेवाईक असलेल्या तरुणाने एका 28 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. तिच्यासाेबत वेळाेवेळी शारिरिक संबंध प्रस्थापित करुन तिच्या नकळत शरीरसंबंधांचे व्हिडिओ बनवले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अनैसर्गिक कृत्य केल्याने आराेपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

भाेलू ऊर्फ विजय लिंबाजी खाेत (वय-27,रा.स्वारगेट,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड राेड पोलिस ठाण्यात आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आराेपी तरुण विजय खाेत याने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी वेळाेवेळी बळजबरीने शरीरसंबंध केले. तसेच तिच्या नकळत काढलेले अश्लील व्हिडिओ व फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत त्याने ब्लॅकमेलिंग सुरु केले. त्यानंतर वारंवार ताे शरीर संबंध करण्यासाठी त्रास देऊ लागला आणि राहते घरी नशा येणारा पदार्थ देवून त्याने अनैसर्गिक कृत्य करुन तिला मारहाण केल्याचे सांगण्यात आलेले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस नरीक्षक एस खडके करत आहे.

तरुणाला बेदम मारहाण

एका लग्नात झालेल्या चेष्टा मस्करीच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील शेवाळेवाडी परिसरात घडला आहे. प्रितम ऊर्फ सूरज गंगाराम पवार (वय-२१,रा.हडपसर,पुणे) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अथर्व साबळे व अभिषेक भाेसले ( दाेघे रा.शेवाळेवाडी,पुणे) यांचे विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितम पवार याचा मित्र अनिकेत फुटाणे याचे 30 ऑक्टाेबर राेजी झालेल्या लग्नात प्रितम आणि अथर्व यांच्यात चेष्ट मस्करीमध्ये झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन प्रितम यास हाताने कानाखाली मारले तसेच लाकडी बांबुने त्याच्या डाेक्यात व पायावर मारुन त्यास शिवीगाळ करुन धमकी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...