आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:रेरा, तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून साडेदहा हजार दस्तांची नोंद;  44 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक

शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे बेकायदा दस्त नोंदविल्याचे उघड झाले आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार कारवाईची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

चहुबाजूने वाढणाऱ्या पुणे शहरासह जिल्ह्यात रेरा आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचे बेकायदा दस्त नोंद होत असल्याच्या तक्रारी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने पुणे शहरातील सर्व २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमधील संशयित दस्तांची तपासणी करण्यासाठी खास समिती गठित केली होती. याबाबत गेल्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ अधिवेशनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बेकायदा दस्त नोंदणी झाल्याची कबुली दिली होती.

शासननियुक्त समितीने केलेल्या तपासणीत शहरातील हवेली क्र. तीन आणि इतर कार्यालयांत ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहा हजार ५६१ दस्त नोंद केल्याचे समोर आले. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणी यापूर्वीच ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नऊ जणांची विभागीय चौकशी सुरू असून बदलीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. नऊ जणांची विभागीय चौकशी सुरू असून, आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात कनिष्ठ लिपिकांवर कारवाई करण्यात येत आहे, असे नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...