आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाॅजवर छापा:बांगलादेशी तरुणीसह चौघींची सुटका ; दलालांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापकासह दलालांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (२९, रा. आळंदी फाटा, लाेणीकंद, पुणे), प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाघमारेला अटक केली आहे. पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात जय भवानी लाॅज येथे वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...