आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय निर्णयाचा निषेध:प्रज्ञा दया पवार, नीरजा यांचे राजीनामे

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. कोबाड गांधीलिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला घोषित झालेला अनुवाद श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कारावरून राज्यात राजीनामासत्र आणि पुरस्कार वापसी सुरू झाली आहे. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य प्रज्ञा दया पवार तसेच कवयित्री व सदस्य नीरजा यांनी राजीनामे दिले आहेत. त्याचप्रमाणे या शासकीय निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुरस्कारप्राप्त लेखक आनंद करंदीकर आणि शरद बाविस्कर यांनी पुरस्कार नाकारला आहे.

बातम्या आणखी आहेत...