आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल जाहीर:दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. बारावीच्या परीक्षेत ३२.२७ टक्के तर दहावीच्या परीक्षेत ३०.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

निकालानंतर दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन दहावीसाठी (http://verification.mh-ssc.ac.in) आणि बारावीसाठी (http://verification.mh-hsc.ac.in) अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी ३ ते १२ सप्टेंबर व छायाप्रतीसाठी ३ते २२ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येईल. मार्च २०२२ परीक्षेसाठी प्रथमच प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी मार्च २०२३ परीक्षा ही अंतिम संधी असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले .

बातम्या आणखी आहेत...