आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रियेचा निकाल:राहुरीतील अग्निवीर भरती प्रक्रियेचा निकाल घोषित

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्करामध्ये अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या ‘अग्निवीर भरती’ मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकाल

https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती कार्यालयात २६ नोव्हेंबरपर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...