आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त महिला प्राध्यापकास सायबर चोरट्यांचा 20 लाखांचा गंडा:तात्काळ तक्रारीमुळे पोलिसांनी 13 लाख रुपये गोठवले

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील प्रतिष्ठीत महाविद्यालयातील एका निवृत्त महिला प्राध्यापकाला सायबर चोरट्यांनी 20 लाखांची फसवणूक केली. विशेष म्हणजे महिला प्राध्यापक सायबर गुन्हेगारी संदर्भात सजग असून अनेकांना त्यासंदर्भात मार्गदर्शनाही करत असते. "केवायसी अपडेट'च्या नावाने हा गंडा घातला गेला. दरम्यान, तक्रार मिळताच अलंकार पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत 20 लाखांतील 13 लाख रुपये बँकेच्या खात्यात गोठवले (सिझ) आहेत अशी माहिती शनिवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 74 वर्षांच्या असून त्या पुण्यातील कोथरुड येथील करिष्मा सोसायटीत राहतात. त्यांना सायबर क्राइमबद्दल ज्ञान आहे. यामुळे त्या नेहमी सजगतेने व्यवहार करतात. तसेच इतरांनाही मार्गदर्शन करतात. दरम्यान, 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता, त्यांना मोबाइलवर एका व्यक्तीचा फोन आला. त्याने "केवायसी अपडेट' ऑनलाइन करावे लागेल असे सांगितले. यानंतर त्यांच्याकडून बॅंकेची व "केवायसी'साठी लागणारी कागदपत्रे ऑनलाइन मागून घेतली. दरम्यान, चोरट्याने रात्रीच 40 ट्रान्सजॅक्‍शन करुन त्यांच्या बॅंक खात्यातून 20 लाख रुपये काढून घेतले. याचे मेसेज त्यांनी सकाळी उठल्यावर मोबाइलवर बघितले आणि अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने यंत्रणा कार्यरत करत पैसे गेलेल्या बॅंक खात्याची माहिती काढती. यातील एका बॅंक खात्यातील दहा लाख तर दुसऱ्या बॅंक खात्यातील तीन लाख संबंधित बॅंकांशी बोलून तातडीने गोठवले. यामुळ सायबर चोरट्यास हे पैसे काढता आले नाहीत. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस सहाणे करत आहेत.

नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आवाहन...

बॅंकेतून केवायसी अपडेटसाठी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीच फोन येत नाही. केवायसी अपडेट करायची असेल, तर प्रत्यक्ष बॅंकेत जाऊन काम करावे. ऑनलाईन केवायसी अपडेट करताना सायबर चोरट्यांकडून आर्थिक फटका बसू शकतो असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...