आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने सकाळी साडेऊन वाजता निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. पी. बी. सावंत यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला.
पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी हे त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी एक आहे. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. 1995 मध्ये ते निवृत्त झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.