आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशाच्या मारहाणीत रिक्षाचालक जखमी:बुक्क्यांचा मार बसल्याने कानामागची फाटली नस; संशयितावर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीटर जोरात पळत असल्यावरून एका प्रवाशाने केलेल्या मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला आहे. बुक्क्यांचा मार बसल्याने चालकाची नस फाटली अन् रक्तस्त्राव झाला. त्यात तो आता स्पष्ट न बोलता अडखळत बोलू लागला आहे. हा धक्कादायक प्रकार गोल्फ क्लब चौकात घडला.

याप्रकरणी प्रवासी म्हणून बसलेल्या मल्हार सुभाष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. याबाबत रिक्षा चालक प्रसाद छगनराव पालकर (वय 59) हे जखमी झाले आहेत. येरवडा पोलिसांनी तक्रारी अर्जावरून पाटील याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रिक्षा चालक आहेत. ते येरवडा भागात रिक्षा चालवतात. सहा महिन्यांपुर्वी (दि. 18 एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास मल्हार पाटील व त्याचे काही मित्र कल्याणीनगर ते भोसलेनगर या प्रवासासाठी रिक्षात बसले होते.

मारहारणीत रक्तस्त्राव

यादरम्यान, रिक्षा येरवड्यातील गोल क्लब चौकात आल्यानंतर त्याने तक्रारदारांना दुसऱ्या मार्गाने रिक्षा भोसलेनगरला घेऊन चल म्हणाला. तसेच, तुझ्या रिक्षाचा मीटर जोरात पळत आहे, असे म्हणत वाद घातला. चालू रिक्षातच त्याने पाठिमागून कानाजवळ चार ते पाच बुक्क्या मारल्या. त्यांना हाताने मारहाणही केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या कानामागील नस फाटून डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना बोलण्यास त्रास होऊ लागला. ते आता स्पष्ट न बोलता अडखळत बोलू लागले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिला होता.

एसटीच्या धडकेत एकाचा मृत्यू

भरधाव एसटीबसने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वानवडी जक्शंन चौक येथे घडली. संजय सुदाम साळवे (40, रामटेकडी,पुणे) यांचा अपघातात मृत्यू झाला. एसटी चालक चांद सुलतान नसरूद्दीन शेख (31, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश अशोक घुसर (19, रा. रामटेकडी,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...