आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनात सहभागी न झाल्याने पुण्यात रिक्षा फोडली:चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंदोलनात सहभागी न होता, रिक्षातून प्रवाशी वाहतूक केल्याच्या रागातून अज्ञातांनी आंबेगाव बुद्रूक परिसरात रिक्षा फोडून नुकसान केले. ही घटना 12 डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चिथावणीखोर वक्तव्याला प्रेरित होउन रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशव नाना क्षीरसागर, संजीव कवडे, आनंद अंकुश, तुषार पवार, बाबा सय्यद यांच्यासह इतर चारजणांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय चंद्रकांत शिर्के( वय 46, रा. कसबा पेठ ,पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

काय आहे घटना ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी कॅबच्या निषेधार्थ पुण्यात 12 डिसेंबरला काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. त्यासाठी आरोपींनी कोणी आंदोलनात सहभागी झाले नाही, तर रिक्षा फोडा, जाळून टाका असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. दरम्यान, आंदोलनात सहभागी न होता, उदय शिर्के यांनी रिक्षातून प्रवाशांची वाहतूक करीत होते. त्यावेळी अज्ञातांनी आंबेगाव परिसरात उदय यांना अडवून रिक्षाची तोडफोड केली. दमदाटी करीत त्यांच्याकडील 500 रूपये हिसकावून नेले. त्यामुळे रिक्षातील प्रवाशी घाबरून सैरभैर पळून गेले. याप्रकरणी तोडफोड करणार्‍या आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली आहे.

सॅनिटायझर खरेदीच्या बहाण्याने टोळक्याने मेडीकलमधील कामगाराला बोलण्यात गुंतवून गल्ल्यातील 15 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना दहा डिसेंबरला रात्री सव्वा आठच्या सुमारास वडगाव शेरीमधील मेडीप्लस मेडीकल मध्ये घडली.याप्रकरणी रमेश अर्जुन वाणी (वय 42, रा. मुंढवा,पुणे) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

15 हजारांच्या रोकडवर डल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश हे मेडीप्लस मेडीकलमध्ये कामाला आहेत. दहा डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास चौघेजण मेडीकलमध्ये आले होते. त्यापैकी एकाने आम्हाला 50 लीटर सॅनिटायझर घ्यायचे आहे, माझा मॅनेजर बाहेर उभा आहे, त्यांच्यासोबत बोलून घ्या असे सांगितले. रमेश यांना मेडीकलमधून बाहेर बोलावून इतर दोघांनी गल्ल्यातील 15 हजारांची रोकडवर डल्ला मारला. पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...