आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Rising Number Of Patients, Deputy Chief Minister And Guardian Minister Ajit Pawar's Instructions To Set Up Three Jumbo Hospitals In Pune

कोरोना:रुग्णांची वाढती संख्या, पुण्यात तीन जम्बो रुग्णालये उभारण्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन

पुणे जिल्ह्यातील “कोरोना’ बाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले. यापूर्वी बालेवाडी येथे एक जम्बो रुग्णालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला असून या ठिकाणी २०० आयसीयू आणि ६०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही स्थितीत रुग्णसंख्या आणखी वाढणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्टअखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागेल. कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी व मंत्रालय स्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. खासगी रुग्णालयाचे बिले स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावअशा स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या.